Mhada
sakal
बापू सुळे
मुंबई : दक्षिण मुंबईतील भायखळा येथील उमरखाडी परिसराचा कायापालट होणार आहे. ७०-८० वर्षे जुन्या असलेल्या उपकर प्राप्त (सेस) इमारतींबरोबरच येथे असलेल्या पीएमजीपी इमारतींचा बांधकाम आणि विकास संस्थेच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. सुमारे २५ हजार चौरस मीटरच्या भूखंडावरील या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने आराखडा तयार केला असून त्याचे लवकरच म्हाडा प्राधिकारणासमोर सादरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे डोक्यावर धोकादायक छप्पर घेऊन दिवस काढणाऱ्या येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.