म्हाडा रहिवाशांसोबत लवकरच करणार पीएएए करार, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी मसुद्याचे काम सुरू; रहिवाशांना विश्वासात घेणार

Mhada Project: म्हाडा लवकरच रहिवाशांसोबत करणार पीएएए करार करणार असून याबाबत मसुद्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
Mhada

Mhada

Esakal

Updated on: 

मुंबई : म्हाडाकडून गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरचा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी अॅण्ड डीए) माध्यमातून समूह पुनर्विकास केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांसोबत म्हाडा लवकरच कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा म्हणजेच (पीएएए) करणार आहे. त्यासाठी या पीएएए करारनाम्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मंजुरी घेऊन रहिवाशांपुढे ठेवला जाणार आहे.

Loading content, please wait...