

MHADA
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मुंबईत ५६ वसाहती असून, त्यावर हजारो सदनिका आहेत. तेथील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता आदी सुविधा आतापर्यंत म्हाडाकडून पार पाडल्या जात आहेत. मात्र, पाणीबिलाची वाढती थकबाकी आणि सोसायटीच्या असहकार धोरणामुळे म्हाडाने पाणीपुरवठ्याची जबाबदारी रहिवाशांवर टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.