
मुंबई: सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे. उरत्या वयात वृद्ध आणि निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याने गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.