
मुंबई : म्हाडाची ताडदेव येथील विक्री न झालेली सहा-सात कोटी रुपये किमतीच्या महागड्या घरांची लॉटरीशिवाय प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. या घरांचा दोन वेळा लॉटरीत समावेश करूनही विक्री न झाल्याने म्हाडाचे जवळपास ५०-५५ कोटी रुपये एकाच इमारतीतील घरांमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे लॉटरीशिवाय या घरांची विक्री करून अडकलेला निधी उपलब्ध करून घेण्याचा म्हाडाचा विचार आहे.