esakal | म्हाडा भरतीचे परीक्षा शुल्क भरण्यातील अडथळा दूर; युपीआय पद्धत रद्द | Mhada
sakal

बोलून बातमी शोधा

Mhada

म्हाडा भरतीचे परीक्षा शुल्क भरण्यातील अडथळा दूर; युपीआय पद्धत रद्द

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदे (vacant post) भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून (Eligible candidate) ऑनलाईन पद्धतीने (online) अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क (exam fees) भरताना अडचण असल्याने म्हाडा प्राधिकरणाने युपीआय (UPI) पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा पर्याय बंद केला आहे. त्यानुसार उमेदवारांना इंटरनेट बँकिंग (internet banking), क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे भरता येणार आहे.

हेही वाचा: Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

म्हाडा भरतीला उमेदवारांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. परंतु काही उमेदवारांना परीक्षा शुल्क भरताना पेमेंट फेल्युअर असा संदेश येत असल्याच्या तक्रारी म्हाडाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार म्हाडाने उमेदवारांना पेटीएम, गुगल पे अशा युपीआय पर्यायाऐवजी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड चा वापर करण्याची सूचना केली होती. तसेच युपीआय मधील अडचण दूर करण्याचे निर्देश संबंधित एजन्सीला दिले होते.

युपीआय पद्धतीतील त्रुटी दूर न झाल्याने अखेर प्राधिकरणाने या पद्धतीने पैसे भरण्याचा पर्याय रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थांना केवळ इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे शुल्क भरता येणार आहे. शुक्रवारी (ता. 1) सायंकाळपर्यंत 1 लाख 83 हजार 309 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर 78 हजार 243 उमेदवारांनी शुल्क भरून भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. तसेच 26 हजार 395 उमेदारांनी अर्ज भरले असून त्यांनी अद्याप परीक्षा शुल्क भरलेले नाही. असे म्हाडा प्राधिकरणाचे सचिव राजकुमार सागर यांनी सांगितले.

loading image
go to top