Mhada: घरासाठी आता आर्थिक ताण नाही, म्हाडाचा दिलासादायक निर्णय

MHADA House Advance Contribution Scheme : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी म्हाडाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.
 MHADA House Advance Contribution Scheme

MHADA House Advance Contribution Scheme

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : म्हाडाचे घर घेऊ पाहणाऱ्यांना सध्या घराची लॉटरी लागल्यानंतर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळताच म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र पाठवत पैसे भरण्यास सांगितले जात होते. आता ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत घरे उभारली जाणार आहेत. त्यामुळे जसे इमारतीचे काम पूर्ण होईल, तसे टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार असून लॉटरी लागल्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत पैसे जमवून भरणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com