

MHADA
ESakal
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला शिरढोण येथील भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या घरांच्या माध्यमातून म्हाडा मालामाल होणार आहे. सुमारे १,१५० घरे सीआयएसएफला भाड्यावर दिली जाणार असून, त्या माध्यमातून महिन्याला एक कोटी १७ लाख रुपये भाडे मिळणार आहे. तसेच डिपॉझिटपोटी दोन कोटी ३४ लाख रुपये म्हाडाला मिळणार आहे. त्याबाबत म्हाडा आणि सीआयएसएफमध्ये करानामा होणार आहे.