

Mhada Project
ESakal
मुंबई : चारकोप आणि गोराईतील बैठ्या चाळींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी अॅण्ड डीए) माध्यमातून समूह पुनर्विकास करणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव आठवडाभरात राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिल्यानंतर पुनर्विकास प्रकल्पाबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून विकसकाच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. येथे वास्तव्यास असलेल्या तब्बल ३२ हजार ४७६ रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे.