मुंबई : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना खुशशबर आहे. या वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे..म्हाडाकडून रहिवाशांना सध्या मासिक २० हजार रुपये भाडे दिले जात असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याची दखल घेत म्हाडाने २५ हजार रुपये भाडे करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्याचा ९८४ रहिवाशांना लाभ होणार आहे. पीएमजीपी वसाहतीत चार मजली १७इमारती असून, त्यामध्ये ९४२ निवासी व ४२ अनिवासी अशा एकूण ९८४ गाळे आहेत..Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय.सदर इमारती मोडकळीस आल्याने २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहतीचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार म्हाडाकडून पर्यायी सदनिका किंवा २० हजार रुपये मासिक भाडे दिले जात आहे, मात्र रहिवाशांकडून भाड्याला पसंती देतानाच वाढीव भाड्याची मागणी केली जात होती. त्यासाठी अनेक जण सदनिका रिकाम्या करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याची दखल घेत म्हाडाने प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे..१७ कोटींचा अतिरिक्त भार९८४ रहिवाशांना २० हजार रुपयांप्रमाणे ७० कोटी ८४ लाख रुपये भाडे दिले जाणार होते, भाड्यात वाढ करून २५ हजार रुपये एवढे केल्याने एकूण ८८ कोटी ५६ लाख रुपये भाडे मोजावे लागणार आहे. वाढीव रकमेमुळे म्हाडावर सुमारे १७ कोटी ७१ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडेल..सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.