Dombivli Politics: निवडणुकीत विरोधक, विकासकामात एकत्र; म्हात्रे कुटुंबाच्या व्यासपीठावरील भेटीने डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ

निवडणुकीत कट्टर विरोधक असलेले म्हात्रे कुटुंबीय विकासकामाच्या भूमिपूजनासाठी एकाच व्यासपीठावर; डोंबिवलीच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण
Mhatre family members from different political parties unite for a development project in Dombivli

Mhatre family members from different political parties unite for a development project in Dombivli

Sakal

Updated on

डोंबिवली : केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांत सक्रिय असले तरी विकासकामाच्या निमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आणि शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे गणेशनगर येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकत्र दिसल्याने डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com