esakal | एमआयडीसी ची पाईपलाईन दोन ठिकाणी फुटली | Dombivli
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसी ची पाईपलाईन फुटली

डोंबिवली : एमआयडीसी ची पाईपलाईन दोन ठिकाणी फुटली

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील एमआयडिसीची 1800 मिमी व्यासाची पाईपलाईन शनिवारी सकाळी दोन ठिकाणी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देसाई गाव व खिडकाळेश्वर मंदिर जवळ ही लाईन फुटली. एमआयडीसी अधिकारी घटनास्थळी पोहोचत असून या लाईनचा पाणी पुरवठा बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.

ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, एमआयडिसी औद्योगिक विभागास पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास फुटली.

हेही वाचा: Mumbai metro update | मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

यामुळे रस्त्यावर पाण्याचे मोठे फवारे उडत होते. सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्याची वेळ असल्याने त्यात कल्याण शीळ रोडवर पाईपलाईन फुटून त्याचे पाणी आल्याने वाहतूक काहीशी मंदावली होती.

ही पाईपलाईन जुनी झाली असल्याने ती वारंवार फुटणे, लिकेज होणे अशा घटना घडत असतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देसाई गाव व खिडकाळेश्वर मंदिर जवळ अधिकारी पोहोचत असून या लाईनचा पाणी पुरवठा आता बंद करण्यात आला आहे. पाणी कमी होताच पाईपलाईन दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top