Mumbai metro update | मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Mumbai metro update | मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई  : मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावर ही चालकरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील कोच बंगळुरू येथून मुंबईत बुधवारी, (ता.27) रोजी दाखल झाले. या  मेट्रो ट्रेनचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी, (ता.29) रोजी दुपारी 3 वाजता चारकोप डेपोमध्ये करण्यात आले.
कोरोनाचा नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रँडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.  बंगळुरू येथून शुक्रवारी, (ता.22) रोजी मेट्रो मुंबईच्या दिशेने निघाली होती. तर, बुधवारी, (ता.27) रोजी रात्रीच्या वेळी मेट्रो मुंबईत दाखल झाली. मार्च 2020 महिन्यांत मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू होतील. मे पासून मेट्रो सेवेत दाखल होईल. मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी 8 कोटी खर्च झाले आहेत. 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचच्या निर्मितीसाठी एकूण 3 हजार 15 कोटी खर्च येत आहे. एकूण कोचची संख्या 576 पर्यंत वाढणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

'आज मेट्रोचे लोकार्पण नाही परंतु, अनावरण करतोय. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो रुजू होणार आहे. मुंबईच्या चारही दिशेने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबईला आखिव रेखीव स्वरूप येणार आहे. जगाच्या पाठीवर एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे कुठे ही सुरू नसतील तेवढी महामुंबईत सुरू आहेत. गेल्या सरकारने मेट्रो कामांना सुरूवात केली होती. त्यापेक्षा अधिक गतीने मी ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.  मेट्रो निर्मितीत हातभार लावणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन', असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले 

Mumbai metro update CM unveils Metro 2A and Metro 7

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com