मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला! वाचा भेटीमागील कारण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी "कृष्णकुंज' येथे धर्मवार संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी रविवारी (ता.8) भेट घेतली.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी "कृष्णकुंज' येथे धर्मवार संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी रविवारी (ता.8) भेट घेतली. एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत पंधरा मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.

ही बातमी वाचली का? आदित्य ठाकरेंच्या 'या' प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष

राज ठाकरे यांनी अलिकडे आपल्या राजकीय भुमिकेत बदल केला असून, पक्षाचा झेंडा देखील बदलला आहे. राज यांनी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यास सुरूवात केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे राज आणि एकबोटे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर एकबोटे यांनी या भेटीबाबत खुलासा केला असला तरी यापुढील काळात राज हे कोणती भुमिका घेतात. याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे वढू बुद्रूक हे समाधीस्थान आहे. त्याठिकाणी 24 मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावे. आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यासाठी आलो होतो, असे एकबोटे यांनी स्पष्ट केले आहे. 

ही बातमी वाचली का? वर्षभरात मेट्रोसाठी सुरू होणार ‘ही’सुविधा
 
कार्यक्रमाचे निमंत्रण 
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 मार्च रोजी आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आपण राज यांची भेट घेतल्याचे एकबोटे यांनी म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Ekbote visits Raj Thackeray