वर्षभरात मेट्रोसाठी सुरू होणार ...‘ही’ सुविधा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) बांधण्यात येत असलेल्या मेट्रो-२ (अ) मार्गिकेवर वर्षभरात प्रवाशांच्या सोयीसाठी रोप-वे सेवा उपलब्ध होणार आहे. रोपवे उभारण्यासाठी देश-विदेशातील नऊ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. दहिसर (पश्‍चिम) ते ते डीएन नगर मार्गावर वर्षाअखेरपर्यंत मेट्रो-२(अ) सुरू होणार आहे. तत्पूर्वी रोप-वेची सेवा सुरू करण्याचा‘एमएमआरडीए’चा मानस आहे.

ही बातमी वाचली का? म्हणून देखील मुंबई पोलिस आहेत एक नंबर! बातमी वाचा, प्रतिक्रिया द्या...

पश्‍चिम उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने रोप-वेचा प्रस्ताव तयार केला आहे. ‘एमएमआरडीए’ने ९ जुलै २०१९ रोजी झालेल्या बैठकीत बोरिवली ते गोराई (८ किमी) आणि मालाड ते मार्वे (४.५ किमी) या दोन ठिकाणी रोप-वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इंडियन पोर्ट रेल आणि रोप-वे कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांनी सर्वेक्षणानंतर दोन्ही मार्गिकांचे अंतर कमी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महावीरनगर मेट्रो स्थानक- पॅगोडा- गोराई (७.२ किमी) आणि चारकोप-मार्वे (३.६ किमी) मार्गावरील रोप-वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. पहिल्या टप्प्यात महावीरनगर ते गोराई या मार्गिकेचेच काम सार्वजनिक-खासगी भागीदारीतून करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहे.

ही बातमी वाचली का? आदित्य ठाकरेंच्या 'या' प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष

नऊ कंपन्यांचा सहभाग 
दहिसर (पश्‍चिम) ते डीएन नगर या मेट्रो-२ ए मार्गिकेवरील महावीरनगर स्थानकापासून गोराईदरम्यान रोप-वे बांधण्यासाठी सुयोग गुरबक्‍सनी फुनिक्‍युलर रोपवेज लिमिटेड, ट्रिंबल सोल्युशन इंडिया, आयटीडी सिमेंटशन इंडिया, कन्वेयर रोप-वे सर्व्हिसेस, माथेरान रोप-वेज, एस्सेल वर्ल्ड ग्रुप, एपीटी इन्फ्राटेक सोल्युशन आणि डोपेलमेर इंडियासह अन्य एका कंपनीने स्वारस्य दाखविले आहे.

ही बातमी वाचली का? कोरोना प्रतिबंधासाठी एचआयव्हीची लस ठरतीये गुणकारी!

अशी असेल‘महावीरनगर ते गोराई’रोप-वे

  • एकूण लांबी ७.२ किमी
  • स्थानके ८
  • प्रवासाचा वेळ ३६ मिनिटे
  • ताशी प्रवासी संख्या ३०००
  • प्रकल्पाची किंमत ५६८ कोटी
  • सवलत कालावधी ४० वर्षे
  • देखरेख खर्च १४२५ कोटी
  • वित्तीय परतावा १४.३ टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rope-way service on 'Metro 1-A' a year round