

Mill Workers House
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबईच्या जडणघडणीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान दिलेल्या गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने २००१मध्ये घेतला आहे. त्यानुसार गेल्या अडीच दशकांत केवळ १७ हजार कामगारांना घरे मिळाली असून, लाखाहून अधिक कामगार आजही घराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सरकार मुंबईत जागा नसल्याचे कारण पुढे करीत मुंबईबाहेर घरे देण्यासाठी जागांचा शोध घेत आहे. त्याला काही कामगार संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे, तर काहींकडून विरोध होत आहे. त्यामुळे कामगारांच्या घरांबाबत सरकारकडून अवलंबल्या जाणाऱ्या तळ्यात मळ्यात धोरणामुळे गिरणी कामगार मुंबईतून हद्दापारीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.