Mumbai : एनएमएमटीच्या उत्पन्नात लाखोंची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
एनएमएमटीच्या उत्पन्नात लाखोंची वाढ

एनएमएमटीच्या उत्पन्नात लाखोंची वाढ

वाशी : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने २३ ऑक्टोबरपासून एसी बसच्या भाड्यात तीस टक्के कपात केली आहे. यामुळे एनएमएमटीचे उत्पन्न वाढले होते. त्यातच ६ नोव्हेंबरपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू असल्‍याने एनएमएमटीची प्रवासी संख्या वाढली आहे.

एनएमएमटीने कोविड काळात बंद केलेल्‍या फेऱ्या पुन्हा सुरू केल्‍या आहेत. त्‍यामुळे उत्पन्नात वाढ होत असून दिवसाला ३४ ते ३५ लाख रुपये उत्पन्न होत आहे. एसटीच्या संपामुळे चार लाखांने उत्पन्न वाढल्‍याचे परिवहन सेवेने स्पष्ट केले.

कोरोनामुळे मर्यादित प्रवाशांनाच परवानगी असल्यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नात घट झाली होती. यामुळे एनएमएमटी तोट्यात चालवावी लागत होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर प्रवासी संख्या वाढू लागली होती. २३ ऑक्टोबर पासून एसी बसच्या भाड्यात परिवहन सेवेने कपात केली होती. त्यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नात वाढ होत प्रति दिवस २८ ते ३० लाखापर्यंत उत्पन्न होते.

एसटी संपामुळे एनएमएमटीने नवीन मार्गावर बस चालवण्यास सुरुवात केली तसेच फेऱ्याही वाढवल्‍या. त्यामुळे एनएमएमटीच्या प्रवाशांची संख्या वाढली असून परिणामी उत्पन्नात वाढ झाली आहे. एसटीच्या बंदमुळे बेलापूर ते खोपोली, ठाणे ते पनवेल, वाशी ते कर्जत आदी ठिकाणी बस वाढवण्यात आल्या आहे.

एसटीच्या संपानंतर बस च्या फेर्‌या वाढवण्यात आल्या आहे. त्यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नात दिवसाला चार लाखाने वाढ झाली आहे. तर एसटीच्या मार्गावरही एनएमएमटी बस सुरू केल्‍या आहेत.

- योगेश कडुसकर, व्यवस्‍थापक, नवी मुंबई परिवहन

loading image
go to top