esakal | फळ व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा, बनावट डेबिट कार्डद्वारे पैसे लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

debit card

नेट बँकिंगद्वारे बँक खात्यातील रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या बँक खात्यातून 2 लाख 75 हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले.

फळ व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा, बनावट डेबिट कार्डद्वारे पैसे लंपास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून एका टोळीने कोपरखैरणेत राहणाऱ्या फळ व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील तब्बल पावणे तीन लाख रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

हे ही वाचा : अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात केली 'ही' मागणी

या प्रकरणात फसवणूक झालेल्या फळ व्यापाऱ्याचे नाव अमोल शिंदे (38) असे असून तो कोपरखैरणे सेक्टर-8 भागात राहण्यास आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मार्केटमधील कामकाज ठप्प असल्याने गत एप्रिल महिन्यामध्ये अमोल शिंदे हा मूळ गावी पुणे येथे गेला होता. त्यावेळी शिंदे याने नेट बँकिंगद्वारे बँक खात्यातील रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या बँक खात्यातून 2 लाख 75 हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले.

नक्की वाचा कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

चोरट्यांनी बनावट डेबिट कार्डचा वापर करुन त्याच्या बँक खात्यातून 13 वेळा वेगवेगळी अशी एकूण 2 लाख 75 हजाराची रोख रक्कम काढल्याचे तसेच काही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. अमोल शिंदे याचे बिझनेस डेबिट कार्ड हे त्याच्या जवळ असताना, चोरट्यांनी 24 तासात रक्कम काढली.

millions of rupees debit through fake debit cards of fruit trader