esakal | आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान

कोरोना संकटामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) परीक्षेला लाखो विद्यार्थी मुकण्याची भिती व्यक्त होत आहे.

आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई : कोरोना संकटामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) परीक्षेला लाखो विद्यार्थी मुकण्याची भिती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आयबीपीएसच्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा सेनेने आयबीपीएस अध्यक्ष राजकिरण राय यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कंगनाने रिया चक्रवर्तीवर तिच्या वकिलांबाबत उपस्थित केले प्रश्न, जर निर्दोष आहेस तर.. - 

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात पार पडतात. या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होतात. यंदा कोरोनामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या नाहीत. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयबीपीएसमार्फत बँकिंग अधिकारी आणि क्लार्क पदाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येते. परंतु, यंदा कोरोनामुळे ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना हि परिक्षा देता येणार नाही. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

परवानगी देण्याची मागणी
पदवी अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे गुणवत्तापत्रक नाही. त्यामुळे त्यांना या परीक्षेत बसता येणार नाही. म्हणून, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसू देण्याची विनंती युवा सेनेकडून आयबीपीएसचे अध्यक्ष राय यांच्याकडे केल्याचे मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )

loading image
go to top