mp imtiyaz jaleel
sakal
विरार - वसईच्या राजकारणात आतापर्यंत बविआ विरुद्ध सारे पक्ष असा सामना रंगत असे. पण यावेळी मात्र सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुती, बविआ अशी लढत होणार असल्याचे चित्र समोर येत असतानाच प्रथमच वसई विरारच्या राजकारणात एमआयएमच्या झालेल्या एन्ट्रीने भाजप आणि बविआ दोघांचे टेंशन वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. रेड कार्पेट हॉटेल लॉनवर. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वसईत 'एल्गार' पुकारला.