एमआयएम, "वंचित'ची ईडी चौकशी का नाही? कॉंग्रेसचे नेत्याचा यांचा सवाल 

समीर सुर्वे
Monday, 4 January 2021

भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरोधी धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावले जाते; पण एमआयएम, वंचित आघाडीवर ईडी का लावत नाही, असा परखड प्रश्‍न कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला. 

मुंबई : भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरोधी धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावले जाते; पण एमआयएम, वंचित आघाडीवर ईडी का लावत नाही, असा परखड प्रश्‍न कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कॉंग्रेसचे नेते शिवकुमार लाड यांच्या वडाळा येथील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. एमआयएम आणि वंचितमुळे भाजपला फायदा आहे. ते कॉंग्रेसची मते खातात आणि भाजपला निवडून देतात. भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरविते, असा हल्लाबोलही त्यांनी केला. "संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूने उभे राहा. सर्वांना सोबत घेऊन जाणारी पार्टी फक्त कॉंग्रेसच आहे हे जगाला दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

MIM, why there is no ED inquiry into VBA Congress leader's question

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM, why there is no ED inquiry into VBA Congress leaders question