Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश

Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश
Mumbai Local Newssakal

Mumbai Local News| सीएसएमटी स्थानकांदरम्यान सलग दोनदा लोकल रेल्वे रुळावर घसरल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी आज अपघातग्रस्त जागेची पाहणी केली. हार्बर मार्गावरील साडेसात डिग्रीचे वळण कमी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली आहे.

सीएसएमटी स्थानकात हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येणाऱ्या लोकल एकाच आठवड्यात दोनदा रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सलग दोन दिवस प्रवाशांचे हाल झाले आहे.

Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश
Mumbai Local Crime: चेष्टामस्करी करण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये मित्रावर चाकूहल्ला!

सोमवारी (ता. २९) सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वळणावरून लोकल येत असताना एक डब्याचे चाक रेल्वे रुळावरून घसरले. तेव्हा रेल्वेकडून अपघाताची चौकशी करण्यात आली. तसेच दुरुस्ती करण्यात आली आहे. तेव्हा रुळांच्या वळणावर काही बिघाड दिसला नाही. म्हणून मध्य रेल्वेने बुधवारी (ता. १) अपघातग्रस्त जागेवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर एक रिकामी लोकल वळणावरून घेऊन जाण्यात आली.

त्याच ठिकाणी लोकलची दोन चाके रुळावरून घसरली. यावेळी रेल्वे ट्रॅकच्या वळणावरील निमुळत्या भागात (टंगरेल) दोष आढळून आला. त्यानंतर मध्य रेल्वेने वळणावरील तो भाग बदलला. त्यानंतर आज महाव्यवस्थापकांनी पाहणी केली.

Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश
Mumbai Local News : ...अन् रिया घरी परतलीच नाही! डोंबिवलीच्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

या कारणामुळे वेगमर्यादा

साडेसात डिग्रीच्या वळणावर लोकलच्या ताशी ३० किलोमीटर वेग आखून देण्यात आला आहे. वळणावर असलेला रेल्वे ट्रॅकचा निमुळता भाग दर महिन्याला बदलावा लागतो. सीएसएमटीचा हा भाग (टंगरेल) काही दिवसांपूर्वीच बसविण्यात आलेला होता.

परंतु सलग दोनदा यात दोष आढळण्यात आल्याने बुधवारी नवीन टंगरेल बदलण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळांचे पॅकिंगचे काम शिल्लक आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त जागेवर लोकलच्या ताशी १० किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात आली. शुक्रवारी सकाळपासून वेगमर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली आहे.

Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश
Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com