... हे तर गलिच्छ राजकारण; अदित्य ठाकरेंनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलं...

तुषार सोनवणे
Tuesday, 4 August 2020

भाजप आणि विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांक़डून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर आज पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी विरोधकांवर ट्विटच्या माध्यमांतून सडकून टीका केली आहे.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण पहायला मिळत आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलिस अधिकाऱ्याला मुंबईत क्वॉरंटाईन करण्यात आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांक़डून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर आज पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी विरोधकांवर ट्विटच्या माध्यमांतून सडकून टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे अशा नेत्य़ांकडून कालपासून सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यात आज नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सुशांतसिंह याची आत्महत्या नाही तर हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे. सुशांतसोबत 13 तारखेच्या पार्टीत कोण सहभागी होतं. तसेच याप्रकरणी सरकारमधील एका मंत्र्याला लपण्याचा प्रयत्न केला जातोय. असा घणाघात राणे यांनी केला.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सरकार एका मंत्र्याला पाठीशी घालतंय, नारायण राणेंचा घणाघात...

त्यावर पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून विरोधकांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात की, महाराष्ट्र सरकार कोरोनाशी खंबीरपणे लढत असताना, सरकारची लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांना सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटूंबावर गलिच्छ आरोप केले जात आहे. राजकीय वैफल्यामुळे अनेकांना पोटदुखी होत आहे. मुंबई पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. मी बाळासाहेबांचा नातू सांगू इच्छितो की, त्यांच्या प्रतिमेला तडा असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. याप्रकरणी मी संयमाने वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास कोणी बदनाम करू शकेल या भ्रमात त्यांनी राहू नये.

 

अदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रांतून प्रतिक्रीया उमटतील हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Aditya Thackeray sharply criticizes the opposition