
मुंबई : दादरच्या कबुतरखान्याला ब्रिटिशकालीन वारसा असून १९३३ मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून त्याची निर्मिती झाली होती. कालांतराने येथे कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरू झाला आणि या जागेचे कबुतरखान्यात रूपांतर झाले. मात्र, इथे जमणाऱ्या कबुतरांच्या थव्यामुळे विष्ठा, पिसं आणि दाण्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि श्वसनविकारांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढला असून पालिकेने हा कबुतरखाना हटवण्याचे आदेश जारी केले.