
मुंबई : ‘‘ हिंदी ही आपल्या मुंबईची बोलीभाषा बनली आहे, मुंबईसारखी कुठेही शुद्ध हिंदी नसेल. हिंदी बोलताना मध्येच एखादा शब्द इंग्रजी किंवा मराठीत येतो. त्यामुळे हिंदी ही आपली बोलीभाषा झाली आहे,’’ असे वक्तव्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याने पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे.