उल्हासनगर - नाका कामगार असलेल्या दोन मित्रांची दारू पार्टी सुरू असतानाच, झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी शकील शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.