crime

crime

sakal

Mumbai Crime: भूलथापा देत पळवून नेलं, अल्पवयीन मुलीचा बळजबरी विवाह; पतीकडून अत्याचार अन्...; नेमकं काय घडलं?

Crime News: वज्रेश्वरीत लग्नाच्या भूलथापा देत एका अल्पवयीन मुलीला पळवून तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

वज्रेश्वरी : लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिची विक्री करून बीड जिल्ह्यात तिचा बळजबरीने विवाह लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला लग्नानंतरही पतीकडून अत्याचारांना सामोरे जावे लागले. या प्रकरणात श्रमजीवी संघटना पीडितेच्या पाठीशी उभी राहिल्याने पतीसह पाच जणांविरुद्ध पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com