
डोंबिवली : डोंबिवली येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून एक्सप्रेस गाडीने अकोला येथे घेऊन जाताना रेल्वे प्रवासा दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गजानन चव्हाण (वय 26) याला त्याच्या अकोला येथील राहत्या घरातून अटक करून कल्याणात आणले. शुक्रवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने त्याला 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कल्याण लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.