Sunil Tatkare : पक्षापासून अल्पसंख्याक दुरावले; मुस्लिम आरक्षणाबद्दल चर्चेने निर्णय घेऊ

या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresakal
Updated on

मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज आमच्यापासून दूर गेलेला जाणवले असून मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सहयोगी पक्षांशी चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘अल्पसंख्याक समाज, दलित आणि आदिवासी पक्षापासून दूर गेल्याने लोकसभेत कमी यश मिळाले असे नाही. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव आहे.’

‘या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणेने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत,’’ असेही तटकरे म्हणाले.

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत १९ ते २१ जून या काळात अहमदनगरमधून राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.