esakal | नरेंद्र मेहतांवर काय कारवाई करणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मेहतांवर काय कारवाई करणार ?

नरेंद्र मेहतांवर काय कारवाई करणार ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सुरवातीपासूनच विरोधक भाजपने महिला सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरलाय. आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा भाजपने लावून धरलाय खरा मात्र आता याच मुद्द्यावरून भाजप तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप केले आहेत. याचे पडसाद आज विधिमंडळात देखील उमटलेत.

मोठी बातमी - स्वतःच्याच आईला नग्न करून व्हायची मारहाण, बातमी वाचाल तर येईल डोळ्यातून पाणी

याबाबत महिला नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीविरोधात सरकार काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे असं म्हटलंय. रीतसर तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. गृहमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज मीरा भाईंदर निवडणुकांनंतर पीडित महिला आपली तक्रार नोंदवणार आहे.

याचसोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील पीडित महिलेशी संपर्क साधला असल्याचं सभागृहाला सांगितलंय. याबाबत या पीडित महिलेने याआधी देखील नोटरी करून तक्रारी केलेल्या असताना कारवाई का करण्यात आली नाही? याची देखील चौकशी व्हावी असे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना केलेत . 

मोठी बातमी -  ...अन्‌ कोरोना शोधण्यासाठी अधिकारी घरोघरी!

या प्रकरणी नगरसेविका नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या कुटुंबियांना देखील जीवाला धोका आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. भाजप वरिष्ठांकडून याबाबत दखल न घेतल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी अनेक महिला नेत्यांचं शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. या सर्व आरोपांचा नरेंद्र मेहता यांनी खंडन केलंय.  

कोण आहेत नरेंद्र मेहता :
 
नरेंद्र मेहता हे २००२ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००७ मध्ये ते मीरा-भाईंदरचे महापौर झाले. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा आमदार म्हणून त्यांना जनतेचा आशिर्वाद मिळाला होता. मात्र त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते. मात्र यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. महापौर निवडणूक जिंकायची आणि आपलं वर्चस्व पुन्हा महापालिकेवर स्थापन करायचं असा मानस मेहता यांचा होता.

mira bhaindar ex mla narendra mehata case opposition asked for action 

loading image