
Viral Video: महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे. मीरा भाईंदर येथे एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर हिंदी भाषिक व्यापारी, गुजराती आणि मारवाडी संघटनांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला. पण या व्हिडिओमागची खरी पार्श्वभूमी काय आहे? नेमकं काय घडलं? जाणून घेऊया या वादाच्या मूळ कारणाबद्दल आणि त्यामागच्या सत्यतेबद्दल.