मीरा-भाईंदर : बॅनरबाजीवरुन मनसे आक्रमक ; आंदोलनाचा इशारा

hoardings in mira- bhayandar
hoardings in mira- bhayandarsakal media

विरार : एका बाजूला कोरोनाचे सावट तर दुसऱ्या बाजूला कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरात वाढत असलेला तणाव यात काळरात्री मीरा भाईंदरभर (mira-bhayandar) लावण्यात आलेल्या बॅनरमुळे (hoardings) या तणावात भर घातल्याचे बोलले जात आहे शहरात अनधिकृत पणे लावलेल्या बॅनरवर (illegal advertisement) आणि ते बॅनर लावणाऱ्यावर तातडीने कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन (MNS strike) करण्याचा इशारा मनसेने दिल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

hoardings in mira- bhayandar
'या' कालावधीत महिलांच्या विरोधात २६११ गुन्ह्यांची नोंद !

संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात "इसबार मीरा भाईंदर का आमदार उत्तर भारतीय होगा" असे बॅनर लावल्याने समाजात तेढ निर्माण होईल . समाजात अशांतता पसरवणाऱ्या आणि वाद निर्माण होणाऱ्या आक्षेपार्ह मजकूराचे बॅनर बनवणाऱ्या व लावणाऱ्या समाजघटकांना अटक करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच हे बॅनर तत्काळ हटविण्यात यावेत,अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष हेमंतभाऊ सावंत यांनी पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त , स्थानिक पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

जर यावर येत्या दोन दिवसात कारवी झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने येथील वातावरण चांगलेच तापले आहे. मीरा भाईंदर मध्ये यापूर्वी स्थानिक आगरी कोळी यांना डावलून उत्तर भारतीय भवन बांधण्यावरून वातावरण चांगलेच तापले असतानाच आता हे उत्तर भारतीय आमदार होणार असल्याचे बॅनर लागल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अजून शिवसेनेने मात्र आपली प्रतिक्रिया दिली नसल्याने शिवसेना गप्प का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com