MNS Mira Bhayandar Marathi Morcha : मीरा-भाईंदरमध्ये सध्या मराठी विरुद्ध अमराठी वादाचे वातावरण तापले असून, या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता (MLA Narendra Mehta) यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आयोजित केलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी बंदी घातल्यानंतर, या घटनेने शहरात तणाव निर्माण केला.