Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

मेट्रोची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी लावून धरली होती.
Mumbai Metro

Mumbai Metro

sakal
Updated on

विरार - वसई विरारकराची नायगाव आणि भाईंदर दरम्यान वाहनासाठी पुलाची मागणी बऱ्याच वर्षापासून सरकार दरबारी पडून होती. आता या मागणीला यश येत असून भाईदरवरून वसई-विरारला रस्तेमार्गे अतिजलद जाता यावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो १३ (मिरा-भाईंदर ते वसई विरार) मार्गिके अंतर्गत दुमजली खाडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com