esakal | मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा; हवेची गुणवत्ता सुधारण्यात देशात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषण कमी

महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि वसई-विरार या सहा शहरांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानात महाराष्ट्रातील सहा शहरांचा समावेश केला आहे.

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा; हवेची गुणवत्ता सुधारण्यात देशात अव्वल

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई- हवेची गुणवत्ता सुधारण्यात मुंबई देशातील अव्वल शहर ठरले आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्राकडून मुंबईला सर्वाधिक अनुदानही देण्यात आले. हवेचे प्रदूषण कमी करणा-या देशभरातील एकूण शहरांमध्ये राज्यातील सहा शहरांचा समावेश आहे.

मुंबईत अच्छे दिन, ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या घटली

शहरांतील वाढते हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने २०१८ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाचे आयोजन केले होते. वाढते प्रदूषण कमी करत हवेची गुणवत्ता २० ते ३० टक्के सुधारण्याचे लक्ष्य यात ठेवले होते. यात देशभरातील सर्व राज्य आणि प्रमुख शहरांनी सहभाग नोंदवला होता. हवेची गुणवत्ता सुधारणाऱ्या शहरांना केंद्राकडून २२०० कोटींचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुदानाचे वाटप करण्यात आले.एकूण १५ राज्यांतील ४२ शहरांची अनुदानासाठी निवड केली असून, त्यांना ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि वसई-विरार या सहा शहरांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानात महाराष्ट्रातील सहा शहरांचा समावेश केला आहे. मुंबईने आपल्या हवेच्या गुणवत्तेत सर्वाधिक ३० टक्के सुधारणा केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मुंबई हे सर्वाधिक आर्थिक मदत मिळवणारे शहरही ठरले आहे. महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशमधील सात शहरांचा यात समावेश अहे.

राज्य                      अनुदान (कोटींमध्ये)
महाराष्ट्र                    ३९६.५
तमिळनाडू                 ११६.५
तेलंगणा                    ११७
उत्तर प्रदेश                 ३५७
प. बंगाल                  २०९.५
आंध्र प्रदेश                 ६७.५
बिहार                       १०२
छत्तीसगड                  ५३.५
गुजरात                     २०२.५
हरियाना                    २४
झारखंड                     ७९.५
कर्नाटक                    १३९.५
मध्य प्रदेश                 १४९.५
पंजाब                       ४५
राजस्थान                   १४०.५

सर्वाधिक अनुदान मिळवणारी पाच शहरे
शहरे                आर्थिक मदत
मुंबई                   २४४                                                                                     कोलकाता            १९२.५                                                                                   बंगळूरु                १३९.५   
हैदराबाद              ११७ 
पटना                  १०२
 

शहरांतील प्रदूषण कमी होत असेल तर आनंदच आहे. मात्र, वाढत्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. मिळणा-या अनुदानातून प्रदूषण कमी करणा-या उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रदूषण करणा-या कारखाने, वाहने, दगडखाणी व इतर स्त्रोतांविरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन

(संपादन- बापू सावंत)