जिभेचे चोचले आता पुरवले जाणार, त्यात मॅकडोनाल्डने दिली आनंदाची बातमी...

जिभेचे चोचले आता पुरवले जाणार, त्यात मॅकडोनाल्डने दिली आनंदाची बातमी...

मुंबई - देशात अनलॉक १ आणि राज्यात मिशन बिगिन अगेनला सुरवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून महाराष्ट्रात सर्वकाही बंद होतं. मात्र राज्याचं  आर्थिक चक्र पुन्हा पुरते करण्यासाठी अटी आणि शर्थींवर आता दुकानं आणि उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळालीये. मुबंईत आता अत्यावश्यक सेवा पास शिवाय फिरता येणार आहे. त्याचसोबत मुंबईतील उद्योग देखील १० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु होतायत. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये लोकं मोठ्या प्रमाणात जातात आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणूनच रेस्टॉरंट, हॉटेल हे बंद ठेवण्यात आलेत. मात्र आता ८ पासून अटी आणि शर्थीने रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली गेलीये. 

नव्या नियमांप्रमाणे ८ जूनपासून देशभरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. मुंबई आणि पुण्यात मात्र राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरीला मान्यता देण्यात आलीये. मात्र अनेक दिवसांपासून हॉटेलमधील जेवण खाणाऱ्यांसाठी ही देखील मोठी आनंदाची बाब आहे. आता घरच्या घरी तुम्हाला हॉटेलातील जेवण मागवता येणार आहे. मुंबईत अनेकांना फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खायला आवडत असतं. अशात लॉकडाऊनमध्ये अनेकांनी त्यांच्या आवडत्या पिझ्झा, बर्गर यासारख्या गोष्टींना मिस केलंय. दरम्यान आता आता या गोष्टी घरपोच मिळू शकणार आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आता मॅकडोनाल्डने सुद्धा ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मॅकडोनाल्ड आपली दुकानं पुन्हा सुरु करायचं ठरवलंय. त्यामुळे आता तुम्हाला तुमचे आवडते फ्राईज आणि बर्गर्स मिळू शकणार आहेत. ज्या भागांमध्ये रेस्टॉरंट  सुरु करण्याची परवानगी आहे तिथे कर्मचाऱ्यांसोबत आता ग्राहकांचं थर्मल चेकिंग केलं जाईल. कोरोनानंतरच्या काळात आता मॅकडोनाल्डमध्ये अधिक स्वच्छता त्याचसोबत फिजिकल डिस्टन्सिंग चे नियम पाळून आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

mission begin again in maharashtra hotels and restaurants take away service to start 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com