घेतला बॅनर आणि दिला चिकटवून, BMC कडून मोठी चूक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घेतला बॅनर आणि दिला चिकटवून, BMC कडून मोठी चूक...

घेतला बॅनर आणि दिला चिकटवून, BMC कडून मोठी चूक...  

घेतला बॅनर आणि दिला चिकटवून, BMC कडून मोठी चूक...

मुंबई : देशभरात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एकीकडे मुंबईतील काही वॉर्डांमध्ये कोरोना डबलिंग रेट हा ७५ दिवसांच्या पुढे गेलाय तर मुंबईतील काही वॉर्ड्स हे आता कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट्स म्हणून समोर येतायत. अशात मुंबई महापालिकेकडून कोरोनावर मात करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातायत. 

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने, सध्याच्या कोरोनाच्या संवेदनशील काळात सर्वांवरच कामाचा मोठा ताण आलाय. यामध्ये सर्वाधिक ताण हा बृहन्मुमंबई महानगरपालिकेवर आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात मुंबई महापालिकेकडून मोठी चूक झालीये. BMC कडून थेट कोर्टाच्या गेटवरच 'हे  प्रतिबंधित क्षेत्र आहे' असा बॅनर चिकटवून टाकला गेला. 

READ MORE क्या बात हैं! लॉकडाऊननंतर कार्यालयीन वावर सुरळीत करण्यासाठी अनोखे प्रयोग, कसे ते तुम्हीच वाचा

मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाच्या गेटवर हा सर्व प्रकार घडलेला पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की मुंबईतील कनिष्ठ न्यायालयातील वकील आणि कस्टेडियनला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मुंबई महानगर पालिकेने थेट कोर्टाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून टाकलं. आता कोर्टाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाल्यानंतर या भागात मोठी खळबळ उडाली आणि झालेला सर्व प्रकार एका अधिकाऱ्याच्या लक्षात आला . अधिकाळ्याला ही चूक समजल्यानंतर तात्काळ हे बॅनर काढून टाकण्यात आलं. 

by mistake BMC puts banner of contentment zone on the gate of court

Web Title: Mistake Bmc Puts Banner Contentment Zone Gate Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top