क्या बात हैं! लॉकडाऊननंतर कार्यालयीन वावर सुरळीत करण्यासाठी अनोखे प्रयोग, कसे ते तुम्हीच वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply

या भागात कोव्हिडला रोखण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले; आता लॉकडाऊननंतरचे जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रयोग करण्यात येत आहेत.

क्या बात हैं! लॉकडाऊननंतर कार्यालयीन वावर सुरळीत करण्यासाठी अनोखे प्रयोग, कसे ते तुम्हीच वाचा

मुंबई : कोरोनाचे संकट लगेच दूर होण्याची शक्यता कमी असून, लॉकडाऊननंतरचे जग कसे असेल, यावर चर्चा सुरू आहे. याचे उत्तर महापालिकेच्या जी दक्षिण प्रभाग कार्यालयाने दिले आहे. कर्मचारी आणि अभ्यागतांच्या हाताचा स्पर्श होणार नाही, अशा पद्धतीने कार्यालय तयार करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे म्हणून अधिकाऱ्यांच्या टेबलाभोवती फायबरची पारदर्शक भिंत उभारण्यात आली आहे.

BIG NEWSमुंबईतील परिस्थिती नक्की कशी आहे? जाणून घ्या डॉ. ओक यांच्याकडून...

जी दक्षिण म्हणजे वरळी-प्रभादेवी प्रभाग हा मुंबईतील सर्वांत पहिला रेड झोन होता. आता या भागातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आले असून, जनजीवन काही प्रमाणात सुरळीत झाले आहे. या भागात कोव्हिडला रोखण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले; आता लॉकडाऊननंतरचे जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रयोग करण्यात येत आहेत.

BIG NEWS - आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि अभ्यागत हाताळत असलेले कूलर आणि वॉशबेसिनचे नळ आता पायाने वापरता येतील. पायाने कळ दाबून पाण्याचा प्रवाह सुरू करता येईल. लिफ्टचा दरवाजाही पायाने उघडता येणार आहे. नागरिकांशी सतत संपर्क येणाऱ्या टेबलांवर फायबरच्या पारदर्शक भिंती बांधण्यात आल्या आहेत. त्यातून कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना कोव्हिड शील्ड देण्यात आल्या आहेत.

BIG NEWSठाणे महापालिका आयुक्तांचीही तडकाफडकी बदली! वाचा, नवे आयुक्त कोण आहेत ते?

अल्ट्रा-व्हायोलेट बॉक्स
कर्मचाऱ्यांच्या साहित्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्ट्रा-व्हायोलेट किरणांचा बॉक्स तयार करण्यात आला आहे. त्यात एका मिनिटात साहित्याचे निर्जंतुकीकरण होईल. अल्ट्राव्हयोलेट रॉडद्वारे लॅपटॉप व ग्लोव्हजचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

a unique experiment to streamline public life after a lockdown, read full story

Web Title: Unique Experiment Streamline Public Life After Lockdown Read Full Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thane
go to top