'या' प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांना हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा | Gopichand Padalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar

'या' प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांना हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Sangali bank election) रणधुमाळीत झालेल्या मारहाणीमुळे (Beating case) गुन्हा दाखल (police FIR) झालेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सह सात जणांना मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) ता 22 डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन (Bail granted) आज मंजूर केला.

हेही वाचा: वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीदरम्यान हाणामारी झाली होती. याबाबत दोन्ही गटांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. यामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पडळकर, ब्रम्हनंद पडळकर, विष्णू अर्जुन, नवनाथ पाटील, विजय पाटील, रुपेश पाटील, आणि हर्षवर्धन देशमुख यांनी अर्ज केला आहे.

न्या व्ही जी बिश्त यांच्या पुढे आज यावर प्राथमिक सुनावणी झाली. पडळकर यांच्या वतीने एड दत्ता माने यांनी बाजू मांडली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ता 22 डिसेंबर रोजी होणार आहे. स्थानिक सत्र न्यायालयाने पडळकर यांचा जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

loading image
go to top