उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार

आमदार कुमार आयलानी यांच्या 25 लक्षवेधी
Maharashtra Assembly
Maharashtra Assemblysakal media

उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी (Kumar Ailani) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) उल्हासनगरातील विविध ज्वलंत अशा 25 मुद्यांवर लक्षवेधी (rise building issue मांडलेली असून त्यात जिव्हाळ्याचा धोकादायक इमारतींचा (Risky buildings) प्रश्न आहे. या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार अशी माहिती आयलानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Maharashtra Assembly
अलिबाग : डंपिग ग्राऊंड , कचरा मुक्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा विषय खूप जटिल झाला आहे. शहरवासीयांनी याविषयी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु धोकादायक इमारतींचा मुद्दा सुटला नाही. हा महत्वाचा व शहरवासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यात 2005 च्या सालानुसार रेडिरेकनर लावावा,एफ.एस.आय वाढवून देण्यात यावा. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांच्या नातेवाईकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. पर्यायी व्यवस्था म्हणून शहरात ट्रान्झिट कॅम्प बनवण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.

अनधिकृत बांधकामे नियमित करावे,महाराष्ट्र सरकारने मंजूर यु.डी.सी.आर.नुसार क्लस्टर योजना करिता दहा हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे, पण उल्हासनगरचे क्षेत्रफळ कमी असल्याने दोन हजार चौरस मीटर लागु केल्याने जनतेला याचा फायदा होईल. तसेच उल्हासनगर महापालिकेत बहुतेक विभागात रिक्त पदे आहेत ते लवकरात लवकर भरती करावे. त्याचबरोबर शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा घालावा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असामाजिक तत्वाच्या व्यक्तींना हद्दपार करावे. शहरातील रस्ते व शासकीय रुग्णालयाचा कायापालट करावा,तसेच म्हारळ,वरप आणि कांबा ग्रामीण क्षेत्रा करिता नवीन पोलिस स्टेशन सुरू करण्यात यावे असे अनेक मुद्दे अधिवेशनात मांडणार असल्याचे उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com