उल्हासनगर - भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार आयलानी आणि माजी महापौर मीना आयलानी यांचा एकुलता एक मुलगा धिरज आयलानी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे..जेमतेम 43 वर्षांचे धिरज हे काळाच्या पडद्याआड गेल्याने आयलानी कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शोकाकूल वातावरणात धिरज यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.धिरज आयलानी हे कन्ट्रक्शन व हॉटेल व्यवसायात होते. निवडणुकीत ते त्यांचे वडील कुमार आयलानी यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत होते. मात्र काही दिवसांपूर्वी धिरज आयलानी यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना मुंबईतील मोठया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते..शेवटी त्यांची गुरुवारी रात्री प्राणज्योत मावळली.धिरज आयलानी यांच्या अनपेक्षित जाण्याने वडील कुमार आयलानी, आई मीना आयलानी, बहीण बिंदीया, त्यांची पत्नी आरजू, 9 वर्षीय मुलगी भाव्या, 6 वर्षीय मुलगी ख्वाईश पोरके झाले आहेत. धिरज यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर यांनी कुमार आयलानी यांच्या निवासस्थानी भेट दिली..अंतिम संस्कार वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार पप्पू कालानी, डिसीपी सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, उद्योगपती महेश अग्रवाल, उद्धव रुपचंदानी, नंद जेठानी, जयराज कल्याणी, अनु मनवानी, मयूर पाटील, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.