MLA Raju Patil : ते ना मंत्री ठरवू शकत ना मी ठरवू शकत...

दहिसर मोरी येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीचे आमचे सहकारी आमदार राजू पाटील असे वक्तव्य करत मनसे महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
MLA Raju Patil
MLA Raju Patilsakal
Updated on

डोंबिवली - दहिसर मोरी येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीचे आमचे सहकारी आमदार राजू पाटील असे वक्तव्य करत मनसे महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यावर आमदार पाटील यांनी मात्र बाजू सावरून घेताना म्हणाले, तो पक्षाचा अजेंडा असतो ते ना मंत्री चव्हाण ठरवू शकत ना मी ठरवू शकत तो सर्वस्वी वरिष्ठांचा निर्णय असतो असे म्हटले आहे.

14 गावातील एका आयोजित कार्यक्रमात भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार राजू पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण यांनी महायुतीमधील आमचे सहकारी असा आमदार पाटील यांचा उल्लेख केला. यावरून मनसे महायुती मध्ये सहभागी झाल्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली बाजू सावरताना सांगितले,

विकास कामे जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र असतो. कारण शेवटी ते सरकारमध्ये आहेत. मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. मी केलेल्या विनंतीला किंवा मी केलेल्या पाठपुराव्याला त्यांनी निधी दिल्यावर अर्थातच तेही लोक उपस्थित राहणार तिथे मीही असणार आहे. त्यामुळे त्यात वेगळ्या दृष्टीने बघण्याचा काही कारण नाही. राहिला विषय पक्षाचे हे जे काही धोरण आहे ते धोरण राज ठाकरे ठरवतात.

ना ते रवींद्र चव्हाण ठरवतात ना मी ठरवू शकत. या गोष्टी वरिष्ठ लेव्हलला जातात. मला वाटतं तेही त्याचा अर्थाने बोलले. काही गोष्टी आमच्या वरिष्ठ ठरवतील. परंतु इथे स्थानिक पातळीवर आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो हे मान्य करायला काही हरकत नाही असे सांगितले.

पुढे ते म्हणाले, 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश झाला आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मी मागणी केली होती, की माझ्या मतदारसंघातील काही रस्ते जे झेडपीच्या अखत्यारित येतात किंवा त्यांच्या खात्यात येतात. त्यांची दर्जोनती करून पीडब्ल्यूडी मधून त्यांना निधी देण्यात यावा. कारण या संस्थांमधून ती कामे होत नव्हती.

माझ्या विनंतीला मात देऊन त्यांनी माझ्या मतदारसंघातील बरेचसे रस्ते अपडेट करून त्यासाठी निधी मंजूर करून दिला. शंभर कोटीच्या आसपास त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी निधी दिला आहे. भोपर ते कोपर तसेच 14 गावातील रस्ता या दोन रस्त्यांचा त्यात समावेश असून त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. विकास कामे जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा मी नेहमीच एकत्र असतो.

भाजप पक्षाच्या कमळ चिन्हाला काळे फसण्यात आले आहे, यावर बोलताना आमदार पाटील म्हणाले, पंतप्रधान पदावरील व्यक्ती ही आपल्या देशाचा मान असते. अशाप्रकारे 15 ते 20 ठिकाणी काळेमा फासली गेली आहे. त्यामध्ये एका गटाची लोकं आरोपी असल्याचे देखील समजत आहे. त्यांच्या पक्षांतर्गत काही धुसफूस असतील त्या मला काय माहिती नाही परंतु जे घडलं ते दुर्दैवी आहे असे आमदार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti
mla satish chavan
Nanded: MLA Anandrao Patil Bondharkar, Superintendent of Police Dr. Neelabh Rohan, MLA Balajirao Kalyankar and jewellers during a meeting to discuss the issues faced by bullion traders.
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com