#JNUAttack : प्रत्येत निवडणुकांच्या आधी काहीना काही घडतंय - रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

मुंबई : काल दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या बेदम मारहाणीविरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटतायत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. अशात राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुंबईत 'गेट वे ऑफ इंडिया'वर सुरु असलेल्या निषेध आंदोलनात सहभाग घेतला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावेळी पोलिस हल्लेकोरांसोबत आहेत की काय? अशी परिस्थिती होती असं रोहित पवार म्हणालेत.  

धक्कादायक : काय झालंय विचारलं की 'तो' सांगायचा TB आहे, पण त्याला तर होता....

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या फी वाढीविरोधात काही विद्यार्थी शांततेत आंदोलन करत होते. साबरमती होस्टेलबाहेर हे आंदोलन सुरु असताना अचानक चाळीस मुलं तिथे आलीत. कुणालाही एकाद्या विद्यापीठात जायचा असल्यास सर्वात आधी पास घ्यावा लागतो, आपली कागदपत्रे विद्यापीठाच्या गेटवर द्यावी लागतात. अशात ही मुलं आत आलीच कशी? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. याचसोबत ही मुलं जेंव्हा विद्यापीठात घुसली तेंव्हा पोलिस तिथे आलेत, मात्र मारहाण करत असताना पोलिस तिथे होते, ते आत का गेले नाहीत? आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी व्हाईस चान्सलर तिथे असणं गरजेचं असतं. अशात गेले काही दिवस ते देखील दिसत नाही म्हणत रोहित पवार यांनी एकूणच घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.  

#JNUAttack : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्या सेमिस्टरचा शेवटचा दिवस आहे, अशात आठ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला. विद्यापीठातील इंटरनेट सेवा  बंद होती. यावेळी सहा हजार विद्यार्थ्यांना मुद्दामून बाहेर ठेवण्यात आलं का ?असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.  

दिल्लीत निवडणूक येऊ घातल्यात, अशात प्रत्येक निवडणुकीआधी काहीना काही घटना घडताना पाहायला मिळाल्यात. त्याचाच तर हा भाग नाहीना अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केलीये. दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. देशातील इतर भागात कुठेही अशी घटना घडू नये असं रोहित पवार म्हणालेत.

MLA Rohit Pawar participate in a agitation called against yesterdays JNU attack

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar participate in a agitation called against yesterdays JNU attack