आ. सुभाष भोईर यांचे विकासकामांचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर

MLA subhash bhoir organised a press conference for his development work
MLA subhash bhoir organised a press conference for his development work

डोंबिवली - शिवसेनेच्या निवडणुक वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांनी साडेतीन वर्षात पूर्ण केलेली विकास कामे आणि प्रस्तावित कामांची माहिती देऊन आपले प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हापरिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनेक प्रभाग व नव्याने समाविष्टं झालेली 27 गावे असा सर्व भागा कल्याण ग्रामीण मतदार संघात समाविष्ट आहे. 27 गावातील पाणी प्रश्न महत्वाचा आहे. तो सोडविण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे व अधिवेशनात दिवा, दातिवली आणि 27 गावातील पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली असल्याची माहिती देऊन लवकरच जलवाहिन्यांचे काम सुरु होईल अशी माहिती भोईर यांनी दिली. मतदार संघात 751 कोटींची विकास कामे मंजूर झाल्याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. 

त्यामध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून 552 कोटी 55 लाख, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 115 कोटी 47 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 15 कोटी 80 लाख, ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 13 कोटी 31 लाख, महावितरणच्या माध्यमातून 43 लाख व आमदार निधीतून 6 कोटी 57 लाख रुपये खर्चाची विकास कामे काही पूर्ण तर काही चालू असल्याचे आमदार भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
पडले येथे मिनी स्टेडीयम उभारणार आहे. एमआयडीसी विभागात पाण्याची टाकी, 27 गावातील मुख्य रस्ते करण्यावर भर, डोंबिवली शहरातील भागात सीसीटीव्ही कॅमेरे, दिवा व काटई येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन, कल्याणफाटा ते कळंबोली 8 पदरी महामार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न, तळोजा पर्यत आलेली मेट्रो दहिसर कल्याण फाटा मार्गे शिळ, दिवा, डोंबिवली कल्याण जोडणार, शिळफाटा- माणकोली उड्डाणपूल व महामार्ग, रिंगरुट (बाह्यवळण महामार्ग) तयार करणार, साबेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तावशीचा (पडले) रस्ता तयार करणार, खिडकाळी, शिळ, दावडी,निळजे, पिसवली, आडवली येथील तलावांचे शुभोभिकरण, मतदार संघात विविध ठिकाणी बसथांबे तयार करणे, शिळ येथे विद्युत उपकेंद्र सुरु करणे, 27 गाव आणि डोंबिवली शहरातील विविध प्रभागात पथ दिवे, कल्याण ग्रामीण मतदारसंघात शासकीय विश्रामगृह आणि 14 गावे व 27 गावात सुसज्ज व्यायामशाळा उभारणार अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली. येत्या एक एप्रिल रोजी आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाम (उपक्रम मंत्री) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवा अधिकारी सुमित भोईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संघर्ष समितीचा संघर्ष दिशाभूल करणारा
27 गावांची वेगळी नगरपालिका करण्यासाठी संघर्ष समिती प्रयत्न करत असताना दुसरीकडे या समितीचा संघर्ष कागदावरच असल्याची टीका शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांनी केली. जर संघर्ष करायचा असेल तर या समितीने रस्त्यावर उतरायला हवे, आंदोलन आणि निदर्शने केली पाहिजे. मात्र यापैकी काहीही होत नाही. 27 गावातील  प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामे द्यायला हवे. मात्र हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ही गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असावी असे सांगत आहेत.

'शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे 27 गावांची परवड सुरु आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातूनच या गावांचा विकास शक्य आहे त्यामुळे गावे वगळू नयेत अशीच माझी ठाम भुमिका आहे.' असे आ. सुभाष भोईर यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com