कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली 'ही' मागणी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींच्या आणि सरपंच त्याचसोबत ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ  देण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींच्या आणि सरपंच त्याचसोबत ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ  देण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. निवडणूकीचा पुढील कार्यक्रम जाहीर होईपर्यंत ही मुदतवाढ द्यावी असंही त्यांनी सरकारला  सुचवले आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्य्मंत्री उध्दव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना ईमेलद्वारे पत्रे पाठविली आहेत. ग्रामपंचायत ही लोकशाहीच्या श्रृंखलेत महत्त्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कोविड-19 अर्थात कोरोना विषाणू संकटामुळे राज्य शासनाने काही निवडणूकीच्या प्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.

सायन हॉस्पिटलच्या डीन यांना मृतदेह प्रकरण भोवलं, सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सहकारी संस्था आणि बँका यामध्ये प्रशासक न नेमता कार्यकारीणीला मुदवाढ देण्यात आली आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. या परिस्थितीत जो न्याय सहकारी संस्थांना आपण लागू केला केला तोच न्याय ग्रामपंचायतींना लागू करण्याची आवश्यकता असल्याच्या सुचना  या पत्रातून आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे.

महानगरपालिकेवर प्रशासक 

कोरोनामुळे तीन महानगरपालिकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम राज्य सरकारने पुढे ढकलला आहे. मुदत संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ न देता, या महानगपालिकांवर प्रशासक नेमले गेलेत.  औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार या तीन महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त केले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेते ते पहावे लागणार आहे.

MLA sudhir mungantiwar writes a letter to uddhav thackeray read full report 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA sudhir mungantiwar writes a letter to uddhav thackeray read full report