
मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन म्हणून मुंबईसह एमएमआरकडे पाहिले जात असून त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत आणि गेल्या वर्षभरात जागतिक स्तरावरील प्रमुख ४५ शहरातील घरांच्या किमतीतील चढउताराच्या पार्श्वभूमीवर नाईटफ्रॅंक या संस्थेने आपला अहवाल जाहीर केला आहे. त्याच्याकडे पाहता देशातील घरांच्या किमतीत बंगळुरु शहरातील घरांच्या किमतीत सर्वाधिक १०.३ टक्क्यांची वाढ नोंदली आहे, तर मुंबईसह एमएमआरमधील घरांच्या किंमती ८.७ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. जागतिक स्तरावरील अनेक शहरातील घरांच्या किंमती घसरण होत असताना भारतीय बाजारात मात्र सकारात्मकता दिसत आहे.