मुंबईनंतर आता MMR क्षेत्रातही ‘आकडों की हेराफेरी'; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप..

KIRIT SOMAIYA
KIRIT SOMAIYA

मुंबई: गेल्या काही दिवसांत मुंबईप्रमाणेच मुंबईबाहेरही कोरोना पॉझिटिव्ह आणि मृतांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसत आहे. भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्याबाबत आक्षेप घेतला आहे. 

एमएमआर क्षेत्रातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या यात काही ठिकाणी ती वाढताना दिसते तर काही ठिकाणी कमी झाल्याची गफलत दिसते. मुंबई आणि आसपासच्या महापालिका क्षेत्रांत कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पालघर आणि पनवेल महानगरपालिकांमधील एकूण आकडयांमध्येही प्रचंड तफावत दिसत आहे.

 रुग्णांची संख्या लपवण्यासाठी ही तर ‘आकडों की हेराफेरी` सुरु असल्याचा आरोप भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हरवल्याच्या बातम्या समोर येताना मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमधील मृत रुग्णांच्या एकूण आकडेवारीत आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतच तफावत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही दिवसांच्या अहवालावरुन दिसून आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन अहवालातील फरक दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत १७ जूनला ७७ मृत्यू होते, तर २३ जून रोजी ते घटून ७४ झाल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा प्रकारे पनवेलमध्ये रोज  मृत्यू घडत असताना १७ जून रोजी ५२ मृत्यू असताना २३ जून रोजीही तितकेच मृत्यू दाखविले आहेत. हा गोंधळ अनेक महापालिकांमधील आकडेवारीत झालेला दिसतो. नक्की हे काय चालले आहे...जिवंत माणसेही गायब आणि मृतही गायब, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.  
MMR region also has difference in numbers of patients 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com