मानसिकदृष्ट्या खचलेल्यांसाठी राज्यव्यापी हेल्पलाईन सुरु करा; आमदार मनीषा कायंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

depression helpline
depression helpline

मुंबई: कोरोनाच्या तडाख्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने राज्यव्यापी हेल्पलाईन निर्माण करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

येत्या काळात "डिप्रेशन" हा आजार आपल्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरणार असून त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मनोविकार तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच मानसिक ताणतणावाखाली असलेल्या नागरिकांसाठी चोवीस तास सुरु राहणारी नवीन हेल्पलाईन सुरु करावी, अशीही मागणी त्यांनी ठाकरे व उद्योगमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा: 'केईएम हॉस्पिटलनेच माझ्या मुलाचा जीव घेतला'; मृताच्या कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप..
    
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना कोरोना महामारीमुळे उद्योगधंद्यांपर्यंत मंदीची झळ पोहचली असून अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने अथवा धंद्यामध्ये झालेल्या नुकसानामुळे  अनेक नागरिकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. 

त्यांच्यात सतत नकारात्मक विचार येत असल्याने यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागण्याची भीती आहे. कोरोनाचे संकट अजूनही वर्षभर आपली पाठ सोडणार नाही. सरकार या सर्व उद्योजकांना तसेच होतकरू व बेरोजगार तरुणांना मदत करीत आहे. परंतु या संघर्षाच्या काळामध्ये " मानसिक आरोग्य " व्यवस्थित असणे फार महत्वाचे आहे. अशा स्थितीत या हेल्पलाईनचा नागरिकांना मोठाच आधार मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

आज काही मोठ्या शहरांमध्ये महापालिकांनी हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. काही खासगी रुग्णालयांच्याही हेल्पलाईन आहेत, मात्र सरकारने सर्व राज्यासाठी मध्यवर्ती हेल्पलाईन सुरु केल्यास ही हेल्पलाईन मानसिक दृष्ट्या हतबल झालेल्या नागरिकांना वेळीच सावरण्यास मदत करेल, असेही कायंदे यांनी म्हटले आहे.

start helpline for people who are in depression 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com