

बापू सुळे
मुंबई : कमी फेऱ्या आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांच्या पसंतीला उतरू न शकलेल्या मोनोरेलला आता सुगीचे दिवस येणार आहे. मोनोरेलच्या ताफ्यात लवकरच सहा नव्या गाड्या दाखल केल्या जाणार आहेत. सध्या या गाड्यांच्या चाचण्या सुरू त्या लवकरच प्रवासी सेवेत येणार आहेत. त्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढणार असल्याने दोन गाड्यांमधील वेळ कमी होणार आहे. तसेच प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.