

MMRDA Budget 2026-27
Esakal
मुंबई : मुंबईसह एमएमआरमधील पायाभूत सुविधांसह वाहतूक प्रकल्पांना बळकटी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. एमएमआरडीएने सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ४८ हजार ०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मेट्रो, भुयारी मार्गिका, तिसरी मुंबई अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे मुंबईचा वेग वाढणार आहे. दरम्यान, २०१७-१८ नंतर प्रथमच एमएमआरडीएने शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.